Ad will apear here
Next
पुण्यात राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
‘गो ग्रीन-से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित स्पर्धा
पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून श्रीकांत जोशी, मुकुंद पात्रीकर, मंजुषा वैद्य व दया कुलकर्णी

पुणे : सुपरमाइंड फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नागपूर येथील नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन- से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाच जानेवारी २०१९ रोजी पुण्यातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल येथे सकाळी नऊ ते १० या वेळेत होईल.

या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या प्लेटवर पहिले चित्र काढून स्पर्धेची सुरुवात करणार आहेत. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत चित्र काढण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनविलेल्या प्लेटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची दखल घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येईल.

ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड यांसह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे विषय दिले जाणार आहेत. यात प्रामुख्याने गट ए, बी, सी, डी, इ, एफ अशा सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. कोणतेही फळ किंवा फुल, आवडता ऋतू, निसर्गचित्र-दृश्य, जग वाचवा-पृथ्वी वाचवा, एकता-अनेकता-एकतेचे बळ, टीम वर्क अशा संकल्पनेवर ही चित्रे असणार आहेत. चित्रकला स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाणार असून, पहिल्या दहा चित्रांना मान्यवरांच्या हस्ते विशेष भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना, तसेच सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
 
‘सर्व शाळांनी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करून घ्यावे व ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्या ऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावा,’ असे आवाहन ‘सुपरमाइंड’च्या मंजुषा वैद्य, दया कुलकर्णी, ‘सामवेद’चे मुकुंद पात्रीकर, रोटरी क्लबचे श्रीकांत जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस :
पाच जानेवारी २०१९
वेळ : सकाळी नऊ ते १०
स्थळ : कटारिया हायस्कूल, मुकुंदनगर, पुणे.
नावनोंदणीसाठी : www.supermindfoundation.org
संपर्क : ९०४९९ ९२८०९/७
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNJBV
Similar Posts
‘रायसोनी’चे विद्यार्थी ‘इग्नाइट ३.०’मध्ये चमकले पुणे : नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘इग्नाइट ३.०’ या स्टार्टअप स्पर्धेत वाघोली येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील मयूर आंबेगावकर व मंगेश अंबुरे यांनी चमकदार कामगिरी केली. ‘थायफॅबेल्स’ या विषयावर विद्यार्थ्यांनी स्टार्टअपचे सादरीकरण केले.
ढेपेवाड्यात रंगले ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’ पुणे : वाडा संस्कृतीतील पारंपारिक वातावरण, जुने खेळ, पाटावरील अस्सल मराठी भोजन अशा वातावरणात चिमुकल्यांना त्यांच्या आठवणीतील आजोळ, महिलांना मनातले माहेर सापडले. निमित्त होते ते पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढेपेवाडातर्फे आयोजित ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’ या उपक्रमाचे.
पुण्यात होणार ‘जीआयआयएस’चा पहिला स्मार्ट कॅम्पस मुंबई : सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) भारतातील पहिला स्मार्ट कॅम्पस पुणे येथे होणार आहे. सिंगापूरमध्ये २०१८मध्ये सादर केलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्मार्ट कॅम्पसची संकल्पना हडपसर आणि बालेवाडीत अंमलात आणली जाणार आहे. नव्या पिढीला २१व्या शतकातील कौशल्ये
मध्य भारतातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणामध्ये ‘सह्याद्री’चा सहभाग पुणे : येथील सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सच्या टीमने नागपूर येथील न्यू एरा हॉस्पिटलमधील एका २८ वर्षीय रुग्णावर नुकतेच हृदय प्रत्यारोपण केले. हे मध्य भारतातील पहिले हदय प्रत्यारोपण असून, पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील ब्रेनडेड झालेल्या एका ३२ वर्षीय दात्यामुळे या रुग्णाला नवजीवन मिळाले. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language